धक्कादायक! करोनाच्या लसीने आणखी एका डॉक्‍टरचा मृत्यू

मियामी – करोनाची लस दिल्यानंतर एका नर्सचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी पोर्तुगालमध्ये घडली होती. ती बातमी ताजी असतानाच आता अमेरिकेतील मियामी शहरात डॉक्‍टर ग्रेगरी मायकल यांचा मृत्यू झाला आहे. करोनाची लसच याला जबाबदार असल्याचा दावा या डॉक्‍टरच्या पत्नीने केला आहे. डॉक्‍टर मायकल यांनी 18 डिसेंबर रोजी लस घेतली होती आणि 16 दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला आहे.

डॉक्‍टर ग्रेगरी मायकलची पत्नी हेइदी नेकेलमान यांनी असा दावा केला आहे की, लस घेण्या अगोदर तिच्या नवऱ्याची तब्बेत अतिशय उत्तम होती. डॉक्‍टर खूप ऍक्‍टिव होते. लस घेण्याअगोदर त्यांना कोणताच आजार नव्हता. मात्र व्हॅक्‍सीनेशननंतर त्यांची तब्बेत अचानक बिघडली.

दरम्यान, डॉक्‍टर ग्रेगरी मायकलच्या मृत्यूनंतर संबंधित कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीच्या प्रवक्तांनी म्हटलंय की,’आम्हाला डॉ. ग्रेगरी यांच्या मृत्यूची बातमी मिळाली. आम्ही याची चौकशी करत आहोत. पण आम्हाला असं वाटतं नाही की, ‘डॉक्‍टरांच्या मृत्यूचा संबंध थेट करोना लसीशी आहे.

डॉक्‍टर ग्रेगरीच्या पत्नीने सांगितलं की, ‘लस घेतल्यानंतर कोणताच साइड इफेक्‍ट दिसला नाही. मात्र तीन दिवसांनी त्यांच्या हातावर आणि पायावर लाल चट्टे दिसत होते. यानंतर जेव्हा तिने माऊंट सिनाई मेडिकल सेंटरमध्ये आपली चाचणी केली. डॉक्‍टरांच्या प्लेटलेट्‌स खूप कमी झाले होते. अगदी झिरोपर्यंत पोहोचले होते.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.