पंजाबमध्ये भाजपवर आणखी एक नामुष्की

चंडीगढ – पंजाबमधील पालिका निवडणुकांत जोर का झटका बसलेल्या भाजपवर आणखी एक नामुष्की ओढवली. त्या राज्यातील मोहाली महानगर पालिकेवरही कॉंग्रेसचा झेंडा फडकला. तर, भाजप आणि शिरोमणी अकाली दलाला (एसएडी) मोहाली निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.

कॉंग्रेस सत्तेवर असणाऱ्या पंजाबमध्ये 8 महानगर पालिका आणि 109 नगर परिषदा, नगर पंचायतींसाठी निवडणुका झाल्या. मोहाली वगळता इतर सर्व ठिकाणचे निकाल बुधवारी जाहीर झाले. कॉंग्रेसने 6 महापालिका ताब्यात घेतल्या. तर, एका महापालिकेत कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. बहुतांश नगर परिषदा आणि नगर पंचायतींची सत्ताही कॉंग्रेसने मिळवली.

इतर पक्षांचा सुपडा साफ झाल्याने गुरूवारी जाहीर होणाऱ्या मोहालीच्या निकालाबाबत उत्सुकता होती. त्या महापालिकेतील 50 पैकी 37 जागा कॉंग्रेसने जिंकल्या. तर उर्वरित 13 जागांवर अपक्षांनी विजय मिळवला. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पंजाबमधील पालिका निवडणुका झाल्याने त्यांचे निकाल देश पातळीवर चर्चेचा विषय बनले आहेत. ते निकाल राजकीयदृष्ट्या भाजपला हादरवणारे, तर कॉंग्रेसचा उत्साह वाढवणारे ठरले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.