उस्मानाबाद – जगभरात थैमान घालणारा करोना राज्यातही फोफावत चालला आहे. उस्मानाबादमध्ये करोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत. उस्मानाबादमध्ये आढळलेला दुसरा करोना पॉझिटिव्ह रुग्ण हा लोहारा तालुक्यातील धानोरी गावाचा रहिवासी आहे. तो काही दिवसांपूर्वी मुंबई येथून परतला होता.
उस्मानाबादेत सापडलेला दुसरा करोना रुग्ण हा मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचा. त्याची तपासणी केल्यानंतर त्याचा वैद्यकीय अहवालात समोर आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
हा करोनाबाधित रुग्ण भाजीपाला गाडीतून मुंबईहून येनेगुरपर्यंत आला आणि त्यांनतर दुधाच्या वाहनात बसून गावी पोहोचला. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 25 जणांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. त्यांना सर्वांना गावातील शाळेत ठेवण्यात आले असून त्यांची स्वॅब तपासणी होणार आहे.