बारामती (प्रतिनिधी)– शहरातील दूध संघ वसाहत येथील 29 वर्षीय तरुणास कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे . त्यामुळे बारामतीतील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 16 वर पोहोचली आहे.
दुध संघ वसाहतची सीमा गृहीत धरुन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
नगर परिषद बारामती येथील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी लॉकडाऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व त्याने सॅनिटाझरचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रशासकीय यंत्रणेस सर्वे कामी व कायदा व सुव्यवस्था कामे सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.