केरळ – भारतात केरळमधल्या आणखी एका व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाली असल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री केके शैलजा यांनी दिली आहे. यामुळे केरळमध्ये सध्या तीन रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
आरोग्यमंत्री केके शैलजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या कांजनगड येथील एका व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाली आहे. हा रुग्ण अलिकडेच चीनमधून भारतात परतला होता. सध्या या रुग्णावर केरळमधल्याच रुग्णालयात विशेष विभागात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.
Kerala Health Minister KK Shailaja: The patient is under treatment at the Kanjangad District Hospital in Kasaragod. The patient’s condition is stable. The patient had returned from Wuhan, China. https://t.co/6id9X57sEq
— ANI (@ANI) February 3, 2020
दरम्यान, कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू झाला असून, 15 हजारपेक्षा जास्त नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.