बेल्हे : बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथे आज नव्याने एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. गावात शुक्रवारी(दि.१९) एका पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या घरातील दुसऱ्या व्यक्तीचा अहवाल सोमवार (दि.२२) रोजी प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे.
बोरी गावातील रुग्ण संख्या २ वर पोहचली आहे. तालुक्यातील रुग्ण संख्येत वाढ होऊन ४० झाली आहे. अशी माहिती जुन्नर चे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली आहे.नागरिकांनी शासकीय नियमांचं काटेकोर पालन कराव तसेच कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन कोळेकर यांनी केलं आहे.