पुणे – परदेशातून आलेल्या शहरात करोनाचा आणखी एक रुग्ण आज आढळूला आहे. यासंदर्भातील माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. यामुळे राज्यात एकूण करोना बाधितांची संख्या ४२ झाली आहे.
माहितीनुसार, पुण्यात आढळलेला करोनाबाधित फ्रान्स आणि नेदरलँडतून प्रवास करून आला आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १८ झाली आहे. यामध्ये पुणे शहरातील ८, तर पिंपरी-चिंचवडच्या १० जणांचा समावेश आहे.
Naval Kishore Ram, District Magistrate of Pune, Maharashtra: One more person has tested positive for #Coronavirus in Pune. The person has travel history to France and Netherlands. Total number of positive cases reaches 18 in Pune and 42 in Maharashtra. pic.twitter.com/TqENpcImnl
— ANI (@ANI) March 18, 2020
दरम्यान, सध्या पुण्याच्या डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये २० करोनाचे संशयित, पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात २३ आणि औंध रुग्णालयात २ संशयित व्यक्ती असल्याचे माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
विमानतळावरच ठसे उमटवणार
करोना रोखण्यासाठी परदेशांतून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विलगीकरण कक्षात 24 तास ठेवण्यात येणार आहे. यावेळी या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून, अहवाल आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर विमानतळावरच या व्यक्तींच्या हातावर विलगीकरणाचे ठसे उमटवले जाणार आहेत.
संशयितांनो नियमांचे पालन कराच, अन्यथा कठोर शिक्षा
ज्या व्यक्तींना घरीच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या व्यक्ती इतरत्र फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे घरीच विलगीकरण करून राहण्याच्या सूचना दिलेल्या व्यक्तींचा पाठपुरावा अधिक परिणामकारक करण्यात येणार आहे. त्या व्यक्तींकडून नियमांचे व दिलेल्या सूचनांचे पालन करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्रास होणार आहे. त्याबरोबर आजूबाजूच्या व्यक्तींना पण करोनाची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे जर अशा व्यक्ती घराबाहेर फिरत असल्याचे आढळले. तसेच त्यांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केले, तर त्या व्यक्तीला कठोर शिक्षा करण्यात येणार असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.