पुण्यात आणखी एकाला कोरोनाची बाधा?

पुणे – शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले करोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. करोना विषाणूचे रुग्ण आढळल्यापासून राज्यात खळबळ उडाली. अशातच देहूरोड येथील दुबईमधूनच आलेल्या एका तरुणाला कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. त्या तरुणाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार, दुबई येथून १३ दिवसांपूर्वी आलेल्या एका २८ वर्षीय तरूणाला कोरोना सदृश्य लक्षण आढळून आले आहेत. त्याला उपचारासाठी आज सकाळी दहाच्या सुमारास देहूरोड कॅन्टोन्मेंट रूग्णालयाचे डॉ. यामिनी आडबे यांनी १०८ च्या रूग्णवाहिकेने तातडीने पुणे येथील नायडू रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच खबरदारीचा उपाय संशयित कुटूंबातील ६ जणांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची मुलगी, विमानात त्यांचा सहप्रवासी, टॅक्‍सी ड्रायव्हर यांची तपासणी केली असता त्याचे नमुनेही पॉझिटिव्ह आले आहेत. अवघ्या 12 तासांत करोनाचे 5 रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली असून, अन्य देशासह पुण्यातही हा विषाणू पसरू नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.