चांदणी चौकासाठी आणखी एक समन्वय अधिकारी

काम सुरू झाल्यानंतर जागेच्या मालकीच्या अडचणी

पुणे – चांदणी चौकातील बहुमजली उड्डाणपुलासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचआय) प्रत्यक्षात कामास सुरूवात करण्यात आली असली, तरी जागेच्या मालकीवरून अजूनही वाद निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने भूसंपादन व व्यवस्थापन विभागातील उप अभियंता राजेंद्र थोरात यांची नियुक्ती केली आहे.

या पुलसाठी महापालिकेकडून 97 टक्के जागेचे भूसंपादन पूर्ण करण्यात आले असून यातील बहुतांश जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय)कडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यानुसार, “एनएचआय’कडे ही जागा हस्तांतरित करण्यात आलेली असून प्रत्यक्षात कामही सुरू करण्यात आले. मात्र, काही ठिकाणी जागेच्या मालकीवरून वाद होत असल्याने कामात अडथळे येत आहेत. तसेच प्रत्यक्ष जागा आणि नकाशातील जागा यावरूनही काही प्रमाणात तफावती असल्याने कामात अडथळे निर्माण होऊन काम बंद पडत आहे. ही बाब लक्षात महापालिका, “एनएचआय’ आणि काम करणाऱ्या कंपनी यांच्यात समन्वय असावा तसेच काही अडचणी निर्माण झाल्यास त्या तत्काळ सोडविण्यात याव्यात, या उद्देशाने थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.