नवी दिल्ली : निर्मात्या- दिग्दर्शक लीना मणीमेकलाई त्यांच्या ‘काली’ माहितीपटाच्या पोस्टरमुळे देशभरात एकच वादळ निर्माण झाले आहे. लीना मणीमेकलाई विरोधात कारवाई देखील केली जात आहे. दरम्यान,या सगळ्यात लीना मणीमेकलाई यांनी पुन्हा एकदा नवीन वादग्रस्त ट्वीट केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे ट्वीट देखील हिंदू देवता कालीमातेशी संबंधित आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी कालीमातेला क्वीर म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा सर्व स्तरातून टीका होताना दिसून येत आहे.
लीना मणीमेकलाई या सातत्याने ट्विटरवर वादग्रस्त पोस्ट करताना दिसत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा कालीमातेबाबत वादग्रस्त ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये लीना यांनी लिहिलं, “माझी काली क्वीर आहे. ती एक मुक्त आत्मा आहे. ती पितृसत्ताकतेवर थुंकते. ती हिंदुत्व उद्ध्वस्त करते. ती भांडवलशाहीचा नाश करते आणि तिच्या हजार हातांनी ती सर्वांना आलिंगन देते.”
“My Kaali is queer. She is a free spirit. She spits at the patriarchy. She dismantles Hindutva. She destroys capitalism, She embraces everyone with all her thousand hands.”
As told to @VOANews
Film on Hindu Goddess Sparks Anger in India https://t.co/6QQOaCqKFn
— Leena Manimekalai (@LeenaManimekali) July 8, 2022
दरम्यान, Queer म्हणजे असे लोक. जे स्वतःबाबत गोंधळलेले असतात. शारीरिकरित्या त्यांना मुलं आवडतात की मुली याचा निर्णय ते घेऊ शकत नाही. हे लोक स्वतःला, पुरुष, स्त्री, ट्रान्सजेंडर, गे लेस्बियन किंवा बायसेक्शुअल यापैकी काहीही मानतात. सोप्या भाषेत, LGBT मध्ये जेवढे प्रकार आहे त्या सर्वांना Queer म्हटलं जाऊ शकतं. हे लोक स्वतःबाबत गोंधळलेले असतात आणि त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाची ओळख ठरवता येत नाही.
दरम्यान लीना मणीमेकलाई यांनी २ जुलैला ट्विटरवर त्यांच्या माहितीपटाचे पोस्टर शेअर केले होते. हे पोस्टर कॅनडाच्या आगा खान म्यूझियममधील एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात आले होते. या पोस्टरवर कॅनडामधील हाय कमिशनने नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला. यानंतर लीना यांच्या माहितीपटाचे पोस्टर ट्विटरने ब्लॉक केले होते.