मुंबई – 2020 हे वर्ष कलाविश्वाला काही फारसे चांगले ठरले नाही. या चालू वर्षा मध्ये बॉलीवूडने अनेक दिग्ज अभिनेते आणि दिग्दर्शक गमावले आहेत. दरम्यान,आज पुन्हा एकदा मनोरंजन विश्वाला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. आज प्रसिद्ध दिग्दर्शक “विजय रेड्डी’ यांचं वयाच्या 84 व्या वर्षी चेन्नईमध्ये निधन झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनोरंजन विश्व शोकाकुल झाले आहे.
Karnataka: Kannada film director Vijay Reddy passes away.
— ANI (@ANI) October 10, 2020
विजय रेड्डी यांनी 37 कन्नड चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे तर 16 हिंदी आणि 12 तेलगू सिनेमा दिग्दर्शित केले आहेत. विजय रेड्डी यांच्या नावावर अनेक हिट चित्रपटांची मोठी यादी आहे. विजय रेड्डी हे मुळचे आंध्र प्रदेश मधले असून त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता.
दरम्यान, आज विजय रेड्डी यांच्या जाण्याने त्यांच्या फॅन्सला आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने विजय रेड्डी यांच्या मृत्यूचीअधिकृत माहिती दिली आहे.