मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

आयसीसीच्या क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने सन्मान केला आहे. सचिनचा समावेश आयसीसीने हॉल ऑफ फेममध्ये केला आहे. त्याच्यासोबत दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज एलन डोनाल्ड, ऑस्ट्रेलियाची माजी वेगवान गोलंदाज कॅथरीन यांचाही समावेश हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला. गुरुवारी लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली. याआधी भारताच्या बिशन सिंह बेदी, कपिल देव, सुनिल गावस्कर, अनिल कुंबळे यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता.

हॉल ऑफ फेमची घोषणा करताना आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साहनी म्हणाले की, सचिन, एलन आणि कॅथरीन यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. आमच्यासाठी ही गोष्ट सन्मानाची आहे. आयसीसीकडून तीनही खेळाडूंना शुभेच्छा. आयसीसी हॉल ऑफ फेमच्या माध्यमातून क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज खेळाडूंच्या योगदानाची माहिती देऊन त्यांचा सन्मान करते. हॉल ऑफ फेमची सुरुवात आयसीसीने फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोशिएशनच्या सहकार्याने केली होती. सुरुवातीला यामध्ये 55 खेळाडू होते. आयसीसीच्या या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी नवीन खेळाडूंचा समावेश केला जातो. हॉल ऑफ फेममध्ये डब्ल्यू जी ग्रेस, ग्राहम गूच, बेरी रिचर्डस या दिग्गजांचा समावेश आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.