प. बंगालमध्ये आणखी एका भाजप कार्यकर्त्याची हत्या

परगना – पश्‍चिम बंगालमध्ये आणखी एका भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. भाजपने सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसवर या हत्येचा आरोप केला, तर प्राथमिक तपासात या हत्येमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. ही हत्या रविवारी रात्री 24 परगना जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून करण्यात आली. पश्‍चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील अमेठीत भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्यानंतर देशभरात झालेली ही तिसरी हत्या आहे.

चंदन शॉ असे हत्या झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल कॉंग्रेस आणि पश्‍चिम बंगालमध्ये वेगाने उदयाला आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्षांच्या अनेक घटना राज्यभर घडल्या आहेत. प्रथमच भाजपाने पश्‍चिम बंगालमध्ये 18 जागेवर यश मिळवले आहे. निकालानंतर पश्‍चिम बंगाल राज्याच्या इतरही भागात तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यालयांची मोडतोड करण्याच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आल्याचा आरोप दोन्ही पक्षांनी परस्परांवर केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×