मुंबई – कॉमेडी किंग कपिल शर्मा गिन्नी आणि १२ डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. २००७ साली कॉमेडी रिएलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिलने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने कित्येक शोजमध्ये काम केले.
View this post on Instagram
कपिल आणि गिन्नीचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे, कारण या सेलिब्रिटी जोडीच्या जीवनात आणखी एका बाळाचे आगमन होणार असून, तो दुसऱ्यांदा ‘बाबा’ होणार आहे . कपिल शर्माची पत्नी गिन्नी गर्भवती असून, नव्या वर्षात त्यांच्या घरी चिमुकल्या पावलांनी नवा पाहुणा येणार आहे. नुकत्याच एका व्हिडीओमध्ये गिन्नी तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली.
View this post on Instagram
कॉमेडी सर्कस,झलक दिखला जा ६ व उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगली पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही आणि त्याने कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
View this post on Instagram
या शोला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.गतवर्षी त्याने गिन्नीसोबत लग्न केले. त्यापूर्वी दीर्घकाळ दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र कपिलने या रिलेशनशिपबद्दल बरीच गुप्तता पाळली होती. अखेर 2017 मध्ये गिन्नीसोबतचा फोटो शेअर करत त्याने हे नाते जगजाहिर केले होते.