गांगुली यांची आणखी एक ऍन्जिओप्लास्टी; दोन स्टेन्टही बसवले

कोलकाता – बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर आज आणखी एक ऍन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. तसेच आणखी दोन स्टेन्टही बसवण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयात वेगवेगळया वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या असून त्याचे आहवाल आल्यानंतर उपचारांची दिशा ठरवली जाईल. गांगुली यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे बुधवारी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हृदयविकाराचा त्रास झाल्यामुळे महिन्याभरात गांगुली यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच महिन्यात सौम्य हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गांगुली यांच्या कोरोनरी धमनीजवळ स्टेंट बसवण्यात आला होता.

गांगुलीच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी आणि उपचाराची पुढील दिशा ठरवण्यासाठी प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट देवी शेट्टी यांनाही बोलावण्यात आले आहे. तसेच पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही गुरुवारी फोनवर संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.