पिंपरी – येरवडा कारागृहातून पळालेल्या आरोपीला वाकड पोलिसांनी पुन्हा बेड्या ठोकल्या. ही घटना मंगळवारी (दि. १६) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
आकाश बाबुलाल पवार (वय २१, रा. आयप्पा मंदीराशेजारी, नढेनगर, काळेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश पवार हा काळेवाडी येथे येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी शाम बाबा यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बालाजी लॉन, काळेवाडी येथे सापळा लावून आरोपीला अटक केली.
आरोपी आकाश पवार हा १३ जून रोजी येरवडा कारागृहातून पळून गेला होता. तेव्हापासून वाकड पोलिस त्याच्या मागावर होते. मे महिन्यात वाकड पोलिसांनी आरोपी पवार याला खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यावेळीही त्याने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.
पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक निरीक्षक हरिष माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर तपास पथकातील पोलीस कर्मचारी शाम बाबा, सागर सुर्यवंशी, बिभीषन कन्हेरकर, बाबाजान इनामदार, विक्रम जगदाळे, बापुसाहेब धुमाळ, नितीन गेंगजे, सुरज सुतार, जावेद पठाण, नितीन ढोरजे, विजय गंभीरे, विक्रम कुदळे, सचिन नरुटे, प्रमोद भांडवलकर, प्रमोद कदम, दिपक भोसले, तात्या शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.