उस्मानाबाद ( प्रतिनिधी) – मराठवाड्यात औरंगाबाद, बीडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. यामध्येच आता उस्मानाबाद जिल्ह्याचाही क्रमांक लागला आहे. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातून गुरुवारी पाठवण्यात आलेल्या 44 नमुन्यातून 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दरम्यान, यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता इथली एकूण रुग्ण संख्या 62 झाली आहे. नागरिकांनी सावध राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्हयातील 44 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 32 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 03 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत. दरम्यान,सर्वजण पनस नगर उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या कॉन्टॅक्ट मधील आहेत. तसेच सर्व मुंबईवरून आलेले आहेत.
उस्मानाबाद – आज पाठवलेले स्वब – 44
निगेटिव्ह -32
Inconclusive -3
♦️9 पॉझिटिव्ह उस्मानाबाद जिल्हा
उमरगा तालुका -2 (बेडगा)
उस्मानाबाद शहर -7
आता जिल्ह्यात एकूण संख्या – 61+1(कारी)=62