पुणे – शहरात सोमवारी दिवसभरात आणखी 832 जण करोनाबाधित सापडले. त्यातच गेल्या आठ दिवसांपासून अत्यवस्थ बाधितांची संख्याही वाढली आहे. तर, आणखी 9 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. असे असताना, 614 जण करोनामुक्त झाले आहेत.
रविवारी दिवसभरात 552 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. तर दोन दिवसांतील स्वॅब तापासणीमधील 2,332 जणांचे अहवाल प्रतीक्षेत होते. त्यातून बाधितांची ही संख्या आली आहे. सोमवारी दिवसभरात 3,736 जणांचे स्वॅब, तर 1,432 जणांची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात आली.
सध्या डॉ. नायडू, ससून आणि खासगी रुग्णालयांत मिळून 9,412 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 486 जणांची प्रकृती चिंताजनक, तब्बल 174 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आले. गेल्या 48 तासांत व्हेंटिलेटरवरील बाधितांची संख्या दुप्पट झाल्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे. तर, 312 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहरात एकूण करोनामुक्तांची संख्या आता 18 हजार 96 वर गेली आहे.