सातारा -जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेत असलेल्या 831 नागरिकांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर 831 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 16, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 24, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 48, कोरेगाव 75, वाई 71, खंडाळा 44, रायगाव 116, पानमळेवाडी 132, मायणी 43, महाबळेश्वर 60, दहिवडी 43, खावली 19, तळमावले 27 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 113, अशा एकूण 831 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील करोनाची सद्य स्थिती
घेतलेले एकूण नमुने – 120742
एकूण बाधित – 33987
घरी सोडण्यात आलेले – 24046
मृत्यू – 1032 उपचारार्थ रुग्ण – 8909