नवी दिल्ली – देशभरात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशातच संरक्षण दलातील जवानांना देखील करोनाची बाधा होत आहे. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) आज आणखी ५३ जण करोनाबाधित असल्याचे आढळले आहेत.
In the last 24 hours, 53 more Border Security Force (BSF) personnel tested positive for #COVID19 and 4 have recovered. There are 354 active cases and 659 personnel have recovered till date: BSF pic.twitter.com/GM1w609FE6
— ANI (@ANI) June 30, 2020
सध्या उपचार सुरू असलेल्यांची एकूण संख्या ३५४ झाली आहे. आतापर्यंत ६५९ जणांनी करोनावर मात केली असल्याची माहिती बीएसएफकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, सोमवारी सीमा सुरक्षा दलाचे २१ जवान करोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर, १८ जणांनी करोनावर मात केली आहे.