126 नागरिकांचे घशातील नमुने तपासणीला
1304 जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी दिवसभरात जिल्ह्यातील 66 जणांना करोनाची बांधा झाली असतानाच जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये येथे उपचार घेत असलेल्या करोनाबाधितांच्या निकट सहवासित 43 तसेच प्रवास करुन आलेले 5 जण अशा 48 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 1 ते 75 वर्षे वयोगटातील 25 पुरुष व 23 महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये माण तालुक्यातील खडकी येथील 44 वर्षीय पुरुष, इंजबाब येथील 28 वर्षीय पुरुष, पळशी येथील 33 वर्षीय पुरुष, मोगराळे 34 वर्षीय पुरुष, दानवलेवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, वावरहिरे येथील 35 वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 21 वर्षीय पुरुष, 22 व 25 वर्षीय महिला, लोणंद येथील 31 वर्षीय पुरुष. कोरेगाव तालुक्यातील सुरली येथील 56 वर्षीय पुरुष, साप येथील 41 वर्षीय महिला. पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 25, 36, 47 वर्षीय पुरुष व 50, 40, 23 वर्षीय महिला, काळकूटवाडी येथील 60 वर्षीय पुरुष.
जावळी तालुक्यातील बिरामणेवाडी येथील 16 व 45 वर्षीय महिला, सायगाव येथील 60 वर्षीय महिला. सातारा तालुक्यातील जिहे येथील 20 वर्षीय युवक, शाहूनगर येथील 38 वर्षीय महिला, एका वृत्त वाहिनीचा कॅमेरामन असलेला 30 वर्षीय युवक (रा. राधिकारोड), खावली येथील 60 वर्षीय महिला, सदर बझार, कपिला पार्क येथील 40 वर्षीय महिला, मोळाचा ओढा येथील 25 वर्षीय पुरुष, बोरगाव येथील 13 वर्षीय युवती, 25 वर्षीय महिला व 1 वर्षाची बालिका, लिंब येथील 39 वर्षीय महिला. चोरगेवाडी येथील 30, 16, 48, 36, 24, 20, 40 वर्षीय पुरुष व 23, 45, 75,35 वर्षीय महिला.
वाई तालुक्यातील अभेपुरी येथील 45 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील वाठार येथील 19 वर्षीय युवती, कैलास अर्पाटमेंट सैदापूर येथील 30 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ कराड येथील 46 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 48 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.