सातारा – जिल्ह्यातील आणखी 43 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी सकाळी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या 1188 झाली आहे. रामवाडी (ता. जावळी) येथील करोनाबाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत 49 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
गुरूवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटरमध्ये येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये निकट सहवासातील 35, प्रवास करुन आलेले 3, “सारी’चे 4, आरोग्य सेवक 1 अशा एकूण 43 नागरिकांचा अहवाल करोनाबाधित आला असून यामध्ये 24 पुरुष व 19 महिलांचा समावेश आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात मुंबई येथून प्रवास करुन आलेला जावळी तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या रुग्णास मधुमेह व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. या 43 जणांमध्ये कराड तालुक्यातील तारुख येथील 60 वर्षीय महिला व 40 वर्षीय पुरुष, कोरीवले येथील 8 वर्षीय बालक,