पुणे – शहरात दिवसभरात बुधवारी दिवसभरात 426 करोना बाधितांची नोंद महापालिका हद्दीत झाली. तर नऊ जणांचा मृत्यू झाला; त्यातील तिघे पुण्याबाहेरील आहेत. तर, 258 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
रुग्णसंख्या सलग या आठवड्यातही 400 पेक्षा जास्त आहे, तर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. क्रिटिकल रुग्णसंख्या 409 असून, त्यातील 247 जण व्हेन्टिलेटरवर आहेत.
बुधवारच्या नव्या बाधितांचा समावेश केला असता, शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या 1 लाख 68 हजार 30 झाली आहे. त्यातील 1 लाख 58 हजार 312 जण करोनामुक्त झाले आहेत.
सध्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 5,272 असून, मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 4,446 झाली आहे. दिवसभरात 4,655 जणांची स्वॅबटेस्ट करण्यात आली आहे.