पुणेकरांची चिंता वाढली; दिवसभरात आणखी 416 करोना पॉझिटिव्ह

पुणे – शहरात नव्या करोना बाधितांच्या वाढ होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. यात मंगळवारी 416 नव्या बाधितांची नोंद झाली. तर क्रिटिकल रुग्णसंख्या सलग दुसऱ्या दिवशीही चारशेपेक्षा जास्त राहिली आहे.

 

ढगाळ वातावरण, पहाटे थंडी अशा मिश्र वातावरणाचा परिणाम बाधितांची संख्या वाढण्याला पोषक ठरत आहे. याशिवाय दिवाळीत कौटुंबिक स्नेहसंमेलन, तसेच गर्दीमुळे करोना बाधितांची संख्या वाढण्याचे भाकीत करण्यात आले होते. तोही परिणाम बाधितांची संख्या पाहिली असता दिसून येतो आहे.

 

शहरातील एकूण करोना बाधितांची संख्या 1 लाख 67 हजार 604 झाली असून, त्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 5,110 आहे. आजपर्यंत 1 लाख 58 हजार 54 जणांना डिस्चार्ज दिला असून, मंगळवारी दिवसभरात 218 जणांना घरी सोडण्यात आले.

 

सध्या 419 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू असून, 252 रुग्ण व्हेन्टिलेटरवर आहेत. दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील तीन पुण्याबाहेरील आहेत. एकूण मृत्यूसंख्या 4,440 आहे. दिवसभरात 3,053 स्वॅब नमुने घेण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.