पुणे – सलग दुसऱ्या दिवशी शहरात सतराशेच्या पुढे बाधित संख्या आहे. शुक्रवारी (दि. 28) 1 हजार 781 बाधित सापडल्यामुळे संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अत्यवस्थ बाधित संख्या वाढली असून, सक्रीय बाधितांच्या संख्येने दीड हजाराचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, दिवसभरात 1 हजार 578 बाधित करोनामुक्त झाले. तर गेल्या 24 तासांत 40 जणांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी (दि. 28) दिवसभरात 6 हजार 449 संशयितांची तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत तब्बल 4 लाख 32 हजार 999 जणांच्या तपासणीत 90 हजार 871 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहरातील एकूण बाधित संख्या 90 हजारांवर पोहचली आहे.
तर करोनामुक्तांची संख्या 73 हजार 517 झाली आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सक्रीय बाधितांची संख्या आता 15 हजार 158 वर पोहोचली आहे. त्यातील 827 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 498 जणांना व्हेंटिलेटर लावले आहे.