पुणेकरांची चिंता संपेना…करोनाचे क्रिटिकल रुग्ण वाढले

शहरात  आणखी 355 नव्या करोना बाधितांची वाढ

पुणे  – करोनाबाधित परंतु क्रिटिकल असलेल्या रुग्णांची गेल्या चोवीस तासांत संख्या वाढली आहे. आता ही संख्या 422 झाले आहेत. पैकी 255 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर, गुरूवारी 355 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली.

 

करोना बाधितांची आकडेवारी वाढत चालली आहेच, परंतु त्याबरोबरच क्रिटिकल रुग्णांचीही संख्या वाढत आहे. दिवसभरात 10 करोना बाधितांचा मृत्यु झाला असून, त्यातील तीन पुण्याबाहेरील आहेत.

 

गुरूवारी 378 जणांना, तर आतापर्यंत एकूण 1 लाख 61 हजार 210 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण करोना बाधितांची संख्या 1 लाख 71 हजार 52 झाली आहे.

 

 

यात ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 5364 असून, एकूण मृत्युमुखी पडलेले 4478 आहेत. गुरुवारी दिवसभरात 3465 जणांचे नमुने घेण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.