सातारा – जिल्ह्यात करोनाबळींची संख्या वेगाने वाढत असल्याने परिस्थिती बिकट बनली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असलेले 31 नागरिक करोनामुळे मृत्युमुखी पडल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शिवनगर, ता. सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, साताऱ्यातील 65 वर्षीय महिला, वडूथ येथील 35 वर्षीय युवक, करंजे येथील 70 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ, सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, आंब्रळे, ता. पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील 72 व 70 वर्षीय पुरुष, महादेवनगर, फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, जाधववाडी, ता. फलटण येथील 55 वर्षीय पुरुष, तरडगाव, ता. फलटण येथील 65 व 87 वर्षीय पुरुष, फडतरवाडीतील 61 वर्षीय पुरुष, कुळकजाई,
ता. माण येथील 84 वर्षीय पुरुष, मलकापूर, ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, विलासनगर (संगमनगर), सातारा येथील 79 वर्षीय पुरुष, देशमुखनगर, खोजेवाडी, ता. सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, कोरेगावच्या आझाद चौकातील 74 वर्षीय महिला, वडूज येथील 69 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन, ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, शाहूपुरीतील 73 वर्षीय पुरुष, पाटखळ,
ता. सातारा येथील 35 वर्षीय युवक, पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष, तडवळे, ता. कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष, कोरेगावातील 84 वर्षीय पुरुष, कराड येथील चार, कोरेगाव व साताऱ्यातील प्रत्येकी एक, अशा 31 जणांचा करोनामुळे मृत्यु झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.