सातारा जिल्ह्यात आणखी 27 मृत्यू 

सातारा  – जिल्ह्यात करोनाच्या गंभीर रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने भीतिदायक चित्र निर्माण झाले आहे. आणखी 27 नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या 752 झाली आहे. ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेडस्‌च्या अपुऱ्या सुविधा, मनुष्यबळाची कमतरता यामुळे मृतांची संख्या वाढत आहे.

सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना विरमाडे, ता. वाई येथील 59 वर्षीय पुरुष, पुसेगाव, ता. खटाव येथील 75 वर्षीय महिला, कठापूर, ता. कोरेगाव येथील 80 वर्षीय महिला, अमरलक्ष्मी, देगाव रोड, सातारा येथील 43 वर्षीय पुरुष, सायगाव, ता. जावळी येथील 50 वर्षीय महिला, वाईतील 77 वर्षीय पुरुष, गोळीबार मैदान, सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, करंजे पेठ, सातारा येथील 53 वर्षीय महिला, विराटनगर, वाई येथील 55 वर्षीय पुरुष, काटवली, ता. जावळी येथील 72 वर्षीय महिला, सोनगाव, ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, रामराव पवारनगर, गोडोली, सातारा येथील 68 वर्षीय पुरुष,

पाटखळ, ता. सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, गोडोली, सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, अंबवडे, ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, शेंदुरजणे, ता. वाई येथील 71 वर्षीय पुरुष, शाहूपुरी, ता. सातारा येथील 84 वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना गजानन चौक, फलटण येथील 56 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, फलटण येथील 35 वर्षीय पुरुष, ओझर्डे, ता. वाई येथील 85 वर्षीय पुरुष, जिंती, ता. फलटण येथील 66 वर्षीय पुरुष, शाहूनगर, सातारा येथील 60 वर्षीय पुरुष,

रविवार पेठ, सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, संगमनगर, सातारा येथील 73 वर्षीय महिला व 63 वर्षीय पुरुष, कोरेगावातील 70 वर्षीय पुरुष, शेरेवाडी (कुमठे) ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, अशा 27 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.

583 जण करोनामुक्‍त

जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेत असलेल्या 583 नागरिकांना बुधवारी घरी सोडण्यात आले असून 1269 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 15, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 41, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 53, कोरेगाव 67, वाई 115, खंडाळा 164, रायगाव 75, पानमळेवाडी 291, मायणी 79, महाबळेश्‍वर 95, पाटण सात, दहिवडी 45, तळमावले 41 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 181, अशा एकूण 1269 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.