पिंपरी-चिंचवड शहरात आणखी 166 करोनाबाधित

दिवसभरात 6 रुग्णांचा मृत्यू

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस घटत असले तरी गेल्या 24 तासांत पुन्हा 166 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 90 हजार 855 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

रविवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (सोमवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 159 जणांना करोनाची लागण झाली असून शहराबाहेरील 7 जणांचा करोना अहवाला सकारात्मक आला आहे.

तर गेल्या 24 तासांत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील पाचजण शहरातील असून एकजण शहराबाहेरील रहिवाशी होते. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1591 वर पोहोचला असून शहराबाहेरील 657 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 2248 ची संख्या आज गाठली. गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील मोशी, रुपीनगर, भोसरी, सांगवी आणि वाकड येथील पाचजणांचा समावेश आहे.

आतापर्यंत शहरातील 87 हजार 384 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 6985 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.