पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 135 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 180 बाधित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज शहरात 135 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 73 हजार 99 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात मागील एक बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4425 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 180 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 68 हजार 306 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 7667 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 387 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 712 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1019 इतकी आहे.