मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. बॉलीवूडशी संबंधित बऱ्याच जणांनी या इंडस्ट्रीतील नेपोटिझमला लक्ष्य केले आहे.
सोशल मीडियावर #JusticeForSushantSinghRajput चे हॅशटॅग बऱ्यापैकी ट्रेंड होत आहे.अनेक ट्विटर यूजर्स करण जोहर यांना फिल्म इंडस्ट्रीत नेपोटिझम प्रोत्साहन देण्यासाठी दोष ठरवित आहेत.
This is heartbreaking….I have such strong memories of the times we have shared …I can’t believe this ….Rest in peace my friend…when the shock subsides only the best memories will remain….💔 pic.twitter.com/H5XJtyL3FL
— Karan Johar (@karanjohar) June 14, 2020
चित्रपट निर्माता करण जोहरवर नेटकरी संतापले असून त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. या सर्वाला वैतागून करणने आता मोठे पाऊल उचलले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर अनेकांनी करण जोहरवर राग काढला. इतकच नव्हे तर त्याच्या आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटींविरोधात बिहार येथे तक्रार दाखल करण्यात आली. पण आता करणने देखील त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मीडियावर अनेकांना अनफॉलो केले आहे.करणने ट्विटरवर अनेकांना अनफॉलो केले आहे. यामध्ये चार सेलिब्रिटींचा समावेश असल्याचे म्हटले जाते.
यामध्ये आलिया भट्ट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा यांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. आता करण फक्त आठ लोकांना ट्विटरवर फॉलो करताना दिसत आहे. त्यामध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, धर्मा प्रोडक्शन इतर लोकांचा समावेश आहे.