चीड आणणारी घटना ! घरातील पुरुषांना मारहाण करून दरोडेखोरांचा दोन महिलांवर बलात्कार

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातून अत्यंत चीड आणणारी घटना समोर आली आहे. पैठण तालुक्यात शेतवस्तीत राहणाऱ्या एका कुटुंबावर 8 ते 10 दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना मारहाण करत लुटमार केली. त्यानंतर अमानुष दरोडेखोरांनी घरातील दोन महिलांवर बलात्कार केल्याचं समोर आलं. यामुळे परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

19 ऑक्टोरबर रोजी रात्री 10 वाजता बिडकीन जवळ घडलेल्या या प्रकारानंतर पोलीस पथक, फिंगरप्रींट तज्ज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही पीडित महिलांवर संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

संभाजीनगर पैठण महामार्गावर असलेल्या बिडकीन पासून काही किलोमीटरवर ही शेतवस्ती आहे. मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास 8 ते 10 सशस्त्र दरोडेखोरांनी वस्तीवरील या घरावर हल्लाबोल केला. प्रथम चाकू व कुऱ्हाड आदी शस्रांचा धाक दाखवत पुरुषांना बेदम मारहाण केली. लुटमार केली.

या दरोडेखोरांनी लुटमार केल्यानंतर घरातील एक युवती आणि महिला अशा दोघींवर अमानुष बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित कुटुंबातील सदस्यांनी मोबाईलद्वारे माहिती दिल्यावर घटनास्थळी मदतकार्य सुरू झाले. या घटनेनंतर जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली असून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.