रद्द झालेल्या एमपीएससी विभागीय परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सेवांतर्गत अर्थात विभागीय परीक्षा घेतल्या जातात. मार्च व एप्रिल महिन्यात होणारी विभागीय परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक आयोगाने प्रसिद्ध केले असून, ही परीक्षा 11 ते 14 जून रोजी होणार आहे.

आयोगामार्फत चार विभागीय परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येणार होती. पहिले 30 व 31 मार्च, दुसरे 22 ते 25 2019 या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले होते. तथापि, काही प्रशासकीय कारणास्तव या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षा आता 11 ते 14 जून या कालावधीत होणार असून, त्याचे वेळापत्रक आयोगाच्या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अंजुमन ई-ईस्लामचे सैफ तैयबजी गर्ल्स हायस्कूल, साबु बाग, 260, जे.बी. बेहराम माग, भायखळा, मुंबई येथे ह्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षेच्या तारखांत बदल झाला असून, परीक्षेच्या वेळा पूर्वीप्रमाणेच असतील. परीक्षांच्या वेळापत्रकात जरी बदल झाला असला तरी, या परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिकेवर पूर्वी नियोजित केलेली तारीखच नमूद असेल, असेही आयोगाने म्हटले आहे.

महाराष्ट्र शिक्षण सेवा या संवर्गातील प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता तसेच आदिवासी विकास विभागातील अधिकाऱ्यांसाठी विभागीय परीक्षा, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, वर्ग-1 विभागीय परीक्षा आणि महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-1 व 2 या विभागीय परीक्षा आयोगामार्फत जूनमध्ये घेण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.