#अर्थसंकल्प2019-20 : घरे, आवास योजना याविषयीच्या अर्थसंकल्पातील घोषणा

मुंबई : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने 27 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला होता. आता मुनगंटीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. येत्या 2-3 महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे अतिरिक्त अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या.

घरे, आवास योजना –

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आतापर्यंत 5 लक्ष 78 हजार 109 लाभार्थ्यांना घरे मंजूर. त्यापैकी 4 लक्ष 21 हजार 329 घरे बांधण्यात आली आहेत. उर्वरित 6 लक्ष 61 हजार 799 लाभार्थ्यांनाही घर मंजूर करण्याचे नियोजन

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागरी भागात सन 2022 पर्यंत 19 लाख 40 हजार घरकुल निर्मीतीचे उद्दिष्ट. 26 लाख नागरीकांनी योजनेअंतर्गत केली नोंदणी. सन 2016-17 ते सन 2018-19 या कालावधीत मंजूर झालेल्या घरकुलांची संख्या 11 लक्ष 8 हजार 810 इतकी आहे

दिव्यांग हा समाजातील अविभाज्य घटक. त्याला सन्मानाने जगता यावे यासाठी 80 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना शासन घरकूल बांधून देणार. यासाठी रु.100 कोटी इतका नियतव्यय

सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी गृहनिर्माण विभागाकरिता रु.7 हजार 197 कोटी 68 लक्ष 34 हजार तरतूद प्रस्तावित

Leave A Reply

Your email address will not be published.