- अंधाधून सर्वोत्कृष्ट चित्रपट तर ‘भोंगा’ सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आयुषमान खुराना आणि विकी कौशलला
नवी दिल्ली – 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या अंधाधून चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, भोंगा या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
श्रीराम राघवन दिग्दर्शित “अंधाधून’ या चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरपूर कौतुक झाले होते. एक डोळस व्यक्ती अंध व्यक्तीचे नाटक करत असताना चित्रविचित्र घटना घडतात आणि चित्रपटाचा शेवट प्रेक्षकाला कोड्यात टाकतो. तर, दुसरीकडे “भोंगा’ या मराठी चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी केली आहे. त्याच बरोबर नागराज मंजुळे निर्मित “नाळ’ या चित्रपटाला दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार श्रीनिवास पोकळेला तर पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सुधाकर रेड्डी यांना मिळाला आहे.
मिळालेले पुरस्कार पुढील प्रमाणे
- बॉलिवूडमधील पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट- अंधाधून
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या व ज्योती तोमर यांना पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (पद्मावत)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी
पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता आयुषमान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी)
सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले- अंधाधून
- मराठी चित्रपट
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- भोंगा
पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)
सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक सुधाकर रेड्डी (नाळ)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे (नाळ)