नवी दिल्ली – भारत विरुद्ध इंग्लंड संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील 4 सामने पार पडले आहेत. या मालिकेतील उर्वरीत एक सामना पार पडल्यानंतर भारत आणि इंग्लंड संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी बीसीसीआयने 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा शनिवारी(19 मार्च) केली आहे. यामध्ये तीन नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
भारत आणि इंग्लंड संघात खेळल्या जाणार्या वनडे मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहेत. या मालिकेतील तीन ही सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव, क्रुणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णा या नवोदित खेळाडूंची वनडे मालिकेसाठी भारतीय संघात प्रथमच निवड झाली आहे.
सूर्यकुमार यादवने सध्या सुरू असलेल्या टी-20 मालिकेतून भारतीय संघात पदार्पण केले आहे. त्याचबरोबर क्रुणाल पंड्याने साल 2018 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर जवळपास 3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्याला वनडे पदार्पणाची संधी मिळणार आहे. मात्र कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून आयपीएल स्पर्धा खेळत असलेल्या प्रसिद्ध कृष्णाची प्रथमच भारतीय संघात निवड झाली आहे.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ 18 सदस्य :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.
#TeamIndia squad for @Paytm ODI series against England announced. #INDvENG
— BCCI (@BCCI) March 19, 2021
भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचे वेळापत्रक :
सामना दिनांक स्थळ वेळ
पहिला सामना 23 मार्च पुणे, गहुंजे दुपारी 1:30 वा.
दुसरा सामना 26 मार्च पुणे, गहुंजे दुपारी 1:30 वा.
तिसरा सामना 28 मार्च पुणे, गहुंजे दुपारी 1:30 वा.