पुणे – राज्य सीईटी सेलतर्फे 2020-21 या शैक्षणिक वर्षातील विविध अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय आणि ललित कला आर्ट शाखेतील 18 अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांच्या तारखा राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दरम्यान, हे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना नियोजन सोपे जाणार आहे, असे सीईटी सेलने म्हटले आहे.
तंत्रशिक्षण
अभियांत्रिकी तथा तंत्रज्ञान, औषधनिर्माण, कृषी संबंधित अभ्यासक्रम, दुग्धशाळा तंत्रज्ञान, मस्त्यविज्ञान या पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी दि.13 ते 17 एप्रिल आणि दि.20 ते 23 एप्रिल 2020 दरम्यान होणार आहे.
मेडिकल
मास्टर ऑफ फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑडिओ स्पीच लॅंग्वेज पॅथोलॉजी, प्रोस्थेटिक्स अँड ऑथ्रोटिक्सची सीईटी जुलै-ऑगस्टदरम्यान होईल. तसेच, ललित कला (फाइन आर्ट) पदवी अभ्यासक्रमासाठी
दि.10 मे (प्रॅक्टिकल) आणि दि.11 मे रोजी (ऑनलाइन) परीक्षा होणार आहे.
व्यवस्थापन
“एमबीए’ आणि “एमएमएस’ पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सीईटी दि.14 आणि 15 मार्च, मास्टर इन कॉम्प्युटर अप्लिकेशन (एमसीए) दि.28 मार्च, मास्टर इन अर्किटेक्चर दि.10 मे, हॉटेल मॅनेजमेंट (पदवी) 10 मे, हॉटेल मॅनेजमेंटची (पदव्युत्तर) सीईटी दि.16 मे रोजी होणार आहे.
विधी
पाचवर्षीय एलएलबी अभ्यासक्रमाची सीईटी दि.12 एप्रिल, तीन वर्षीय एलएलबी सीईटी दि.28 जून, बी.पीएड. दि.11 मे, इंटिग्रेटेड बी.एड. आणि एम.एड. दि.12 मे, एम.पीएड. दि.14 मे, बी.ए., बी.एसस्सी. बी.एड. दि.20 मे, मास्टर इन एज्युकेशन (एम.एड.) दि.26 मे, बॅचलर ऑफ एज्युकेशन (जनरल अँड स्पेशल) 13 जून आणि 14 जून रोजी सीईटी आहे.
सीईटी परीक्षांच्या सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळ : www.mahacet.org