लखनौ –आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने 24 जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत गोरखपूर शहराच्या उमेदवाराचे नावही समाविष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात गोरखपूर शहर मतदारसंघातून सभावती शुक्ला यांना तिकीट देण्यात आले आहे.
दुसरीकडे, अखिलेश यादव मुबारकपूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावतील. याशिवाय बैजनाथ पासवान यांना मोहम्मदाबाद गोहना, तर किशन दीक्षित यांना वाराणसी दक्षिणमधून तिकीट देण्यात आले आहे. बलिया नगरमधून नारद राय, सेवापुरीमधून सुरेंद्र सिंह पटेल, राणीगंजमधून आर. के. वर्मा आणि रुद्रपूरमधून प्रदीप यादव यांना तिकीट दिले आहे.
यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी पक्षाने 10 जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. यामध्ये 28 वर्षीय युवा नेत्या पूजा शुक्ला यांना लखनौ उत्तरमधून, तर राजू गांधी यांना लखनौ कॅंटमधून, रविदास महरोत्रांना लखनौ सेंट्रलमधून, अनुराग भदौरिया यांना लखनौ पूर्वमधून, अरमानला लखनौ पश्चिममधून आणि गोमती यादव यांना बक्षी तालबमधून तिकीट देण्यात आले आहे.
दरम्यान, आज भाजपने बनारसमधील 8 पैकी 6 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने या जागांवर पुन्हा जुन्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवत आपल्या जुन्या आमदारांना पुन्हा तिकीट दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे.