पुणे – जिल्ह्यातील 14 डिसेंबर 2019 ते 31 मार्च 2020मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या एकूण 13 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. 8 डिसेंबरला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील दौंड व पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी तीन हवेलीमधील दोन, मावळ दोन तर खेड व आंबेगाव तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
बुधवारी (दि. 6) निवडणुकीची नोटीस तहसीलदार प्रसिद्ध करणार आहेत. 16 ते 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून अर्जांची छाननी तर 25 नेव्होंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहेत. 8 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर मतमोजणी 9 डिसेंबरला होणार आहे.
पुरंदर तालुक्यातील धनकवडी, दवणेवाडी व नावळी, हवेलीमधील कल्याण व आगळंबे, मुळशीमधील निवे, दौंडमधील राहू, टेळेवाडी व पिलाणवाडी, मावळ तालुक्यातील कान्हे व जांभूळ तर आंबेगावमधील विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.