सातारा – करोनाच्या भीतीमुळे मानवी जीवन तणावग्रस्त झाले आहे. घरात बसून राहावे लागल्यानेही अनेक जण मानसिक ताणतणावातून जात आहेत. या नागरिकांच्या तणावमुक्तीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वीस तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. “मनोबल’ नावाची हेल्पलाइनही सुरू करण्यात आली असून या हेल्पलाइनला साताऱ्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे .
करोनाच्या संसर्गजन्य आजाराच्या भीतीमुळे संपूर्ण समाज तणावग्रस्त आहे. या ताणतणावांमुळे माणसाला अनेक व्याधींना सामोरे जावे लागू शकते. तणावग्रस्तांना मानसिक उपचार मिळावेत यासाठी परिवर्तन संस्था व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी “मनोबल’ ही हेल्पलाइन सुरू केली आहे. प्रशिक्षित मानस मित्रमैत्रिणी व वीस तज्ज्ञ समुपदेशकांचा यामध्ये समावेश आहे. करोनाची भीती व त्यातून आलेले नैराश्य दूर करण्यासाठी लोकांचे समुपदेशन केले जाणार आहे.
मन मोकळे करण्यासाठी आधाराची गरज वाटल्यास हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले आहे. मराठी व हिंदी भाषेतून दिली जाणारी ही सेवा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील नागरिकांसाठी मोफत उपलब्ध राहील. नागरिकांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. “चला भावनिक प्रथमोपचार द्यायला शिकू या’ हे ऑनलाइन प्रशिक्षण परिवर्तन संस्था आयोजित करत आहे. अधिक माहितीसाठी रेश्मा कचरे, 9561911320 व योगिनी मगर 9665850769 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समुपदेशकांची यादी व संपर्क क्रमांक – सुनीता भोसले 9552459553, राणी बाबर 9923095901, योगिनी मगर 9665850769, रूपाली भोसले 8149278509, मोरेश्वर देशमुख 9860414603, नंदिनी जाधव 9422305929, कृतार्थ शेवगावकर 9823974400, राजू इनामदार 9822917580, नितीन लेले 9284914172, रेश्मा कचरे 9561911320, नंदिनी जाधव 9422305929, कृतार्थ शेवगावकर 9823974400, राजू इनामदार 9822917580, नितीन लेले 9284914172, रेश्मा कचरे 9561911320, प्रभाकर नाईक 7719838747, प्रिया कदम 9923886741.
अण्णा कडलासकर 9270020621 (सर्व पूर्ण वेळ), माधुरी आवटे 9420216505 (दुपारी 1 ते 6) श्रुती मधुदीप 8788974365 (दुपारी 2 ते 5), अर्चना बिरदवडे 9209834762 (दुपारी 2 ते 7), सुनीता देशमुख 7020402352 (दुपारी 2 ते 6), राजेंद्र पवार 9421909799 (दुपारी 4 ते 6), चंद्रकांत भिसे 7507660111 (सकाळी 11 ते 6).