नगर : शिखर बँक घोटाळ्या संदर्भात करण्यात आलेल्या सुमारे वीस चौकशी अहवालात शरद पवार यांचे कोठेही नाव नाही, असे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पवार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी अण्णा हजारे यांनी आश्चर्य व्यक्त केले.
अण्णा हजारे यांनी म्ंहंटले की, राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकारणात शरद पवारांचे नाव कसं आलं मला माहीत नाही. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई व्हावी. जे दोषी नाहीत, त्यांना विनाकारण अडकवू नये. मी दिलेल्या पुराव्यात शरद पवार यांचं नाव नाही. पण पुरावे देऊनही ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. माझ्याकडं शरद पवारांचे नाव नाही हे सत्य आहे. जे सत्य आहे ते सत्यच, खोटे आरोप करणे चुकीचे आहे, असेही हजारे म्हणाले.