परत फसवणूक झाल्यास सरकारचा खोटारडेपणा उघड करीन – अण्णा हजारे

अहमदनगर – मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्यात झालेल्या प्रदीर्घ सहा तासांच्या बैठकीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेत असल्याची घोषणा अण्णांनी सांगितले होते मात्र, आता पुन्हा फसवणूक झाली, तर आंदोलन करण्याच्या आधी देशभर फिरून सरकारचा हा खोटारडेपणा उघड करीन,’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

याबाबत सविस्तर वृत्त असते कि, ५ फेब्रुवारीला उपोषणाच्या सातव्या दिवशी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्यासह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुभाष भामरे,गिरीष महाजन हे अण्णा हजारेंच्या भेटीसाठी राळेगणसिध्दीमध्ये पोहचले होते. त्यानंतर लोकपाल हा विषय सर्वोच्च न्यायालयात असून 13 फेब्रुवारीला त्यावर निवड समितीची बैठक आहे. त्याबाबतचं पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून अण्णांना देण्यात आले. हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास अण्णांना देण्यात आला होता.

उपोषणाच्या सातव्या दिवशी आंदोलन मागे घेतल्यानंतर हजारे राळेगणसिद्धीमध्येच विश्रांती घेत आहेत. अण्णा हजारे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता प्रतिक्रिया दिली कि,सरकारने जाणीवपूर्वक आश्वासन पूर्ण केल्याचे टाळले, तर आपण पुन्हा आंदोलन करणार आहोत. मात्र, या वेळी आंदोलन करण्यापूर्वी देशभर दौरा करणार, लोकांमध्ये जाणार, सरकार कसे खोटे बोलते हे लोकांना समजावून सांगणार आणि त्यानंतर उपोषणाला बसणार. उपोषण केल्यानंतर थकवा जाणवत असला तरी येत्या आठ-दहा दिवसांत आपण पूर्ण बरे होऊन नेहमीप्रमाणे कामाला लागू शकू. त्यामुळे प्रकृतीची चिंता करण्याचे कारण नाही.’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)