अण्णांच्या आंदोलनामुळे मोदी केंद्रात सत्तेत – राज ठाकरे   

पारनेर – लोकपाल, लोकायुक्त नियुक्त करा, तसेच शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करा, या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत उपोषणाला बसलेले आहेत. अण्णा हजारे यांची भेट आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. यावेळी या नालायकांसाठी जिवाची बाजी लावू नका. उपोषण सोडा, अशी विनंती केली आहे.

राज ठाकरे म्हणाले कि, या नालायकांसाठी जिवाची बाजी लावू नका. ही अत्यंत खोटारडी, ढोंगी माणसे आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून कोणतीही गोष्ट करू नका. अण्णांच्या आंदोलनामुळे आज नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर आहेत. तसेच यावेळी राज ठाकरेंनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, केजरीवालांनी येथे येयला पाहिजे होते. केवळ अण्णांमुळे तुम्ही दिल्लीतील सत्तेवर बसले आहात. नाहीतर कोण केजरीवाल? कोणी ओळखत होते का?. ही सगळी कृतघ्न माणसे आहेत. यांच्यासाठी जीवावर बेतलं असे आंदोलन करू नका. हे सरकार गाडण्यासाठी मी अण्णांसोबत आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

पश्चिम बंगालच्या काल झालेल्या ममता बॅनर्जी यांच्या संघर्षाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी देशांतील स्वायत्तसंस्था हाताशी धरून राजकारण केले असून, काल पश्चिम बंगाल मध्ये झालेला पोलिसांनी सीबीआय यांच्यातील संघर्ष देशातील हिताचा नसल्याचेही त्यांनी सांगून, राज्यात एखादी गोष्ट होत असेल तर त्याची जबाबदारी त्या राज्याची आहे, चाळीस लोक एखाद्या अधिकारी यांच्याकडे पाठवायची काय गरज होती असा सवाल त्यांनी केला. भाजपाच्या व नरेंद्र मोदी यांच्या सरकाच्या काळात सुप्रीम कोर्ट ते चार न्यायाधीश पत्रकार परिषद घेतात, सीबीआय प्रमुखाची तडकाफडकी बदली केली जाते, आरबीआय चे गव्हर्नर राजीनामा देतात हे योग्य नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.