अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विक्की जैन हे दोघेजण सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघेजण
आपल्या चाहत्यांशी सतत व्हिडिओ आणि फोटोज शेअर करत असतात. अंकिता आणि विक्की यांनी नुकताच त्यांचा एक रोमांस असलेला व्हिडिओ चाहत्यांशी शेअर केला आहे.
यात दोघांची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येते. हा व्हिडिओ अंकिताने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये “दिल इबादत…’ हे गाण्याचे संगीत ऐकू येते. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अंकिता म्हणाली होती की, मी आणि सुशांत दोघांनीही आपआपल्या जीवनात पुढील वाटचाल सुरू केली होती. मी विक्की जैनला डेट करत असून त्याच्यासोबत मी खुष आहे. दरम्यान, सुशांतसोबतच्या ब्रेकअपनंतर अंकिता खुप दुःखी होती.
View this post on Instagram
Beauty is not in the face , Beauty is a light In the heart .❤️ #shooting #jwellery
परंतु त्यानंतर अंकिताच्या जीवनात विक्की जैन आला. अंकिता आणि विक्की यांची एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून ओळख झाली होती. यानंतर दोघांमधील जवळीकता वाढली. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अंकिताने गतवर्षी प्रदर्शित झालेल्या “मणिकर्णिका’ चित्रपटातून कंगणा राणावतसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. यानंतर अंकिता “बागी3’मध्ये झळकली होती. यात अंकिता, टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरने मुख्य भूमिका साकारली होती.