ओझरे व लुमेवाडी बंधाऱ्याची अंकिता पाटील यांच्याकडून पाहणी

नीरा नरसिंहपूर- निरा नदीवरील लुमेवाडी व ओझरे बंधाऱ्याचे पुराच्या पाण्याने मोठे नुकसान झाले आहे, याची पाहणी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांनी केली. या दोंन्ही बंधाऱ्यांच्या दुरूस्तीबाबत त्यांनी संबंधीतांना सूचना केल्या.

ओझरे बंधाऱ्याचे पाच खांब कोसळले असून स्लॅबही वाहून गेल्याने बंधाऱ्यावरील दळणवळण बंद आहे. तसेच लुमेवाडी बंधाऱ्याच्या बाजूचा मातीचा भराव वाहुन गेल्यानेही बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे. अलिकडच्या काळात बंधाऱ्यावरील रस्ते हे दळणवळणाचे साधण झालेले आहेत. मात्र, पुरामुळे बंधारे नादुरुस्त झाल्याने नागरीकांची अडचण झाली असून या बंधाऱ्यात पाणी साठविता येणार नसल्याने शेतीही धोक्‍यात आली असल्याचे ओझरे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव शिंदे, हनुमंत गायकवाड यांनी सांगितले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here