“पवित्र रिश्ता’मधून घराघरात पोहोचलेली अर्चना अर्थात अभिनेती अंकिता लोखंडे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. तिचा एक्स बॉयफ्रेंड, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर तिने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे ती खूपच चर्चेत होती. तसेच सोशल मीडियावरही ती सक्रिय असल्याने नेटकऱ्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. ती आपण अजूनही सुशांतला विसरलो नाही हे पोस्टमधून दाखवून देत असते.
View this post on Instagram
नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. मकरसंक्रांतीनिमित्त अंकिता लोखंडे हातात पतंग घेऊन सुशांतच्या लोकप्रिय गाण्याच्या आठवणीत रमलेली दिसत आहे. अंकिता लोखंडे सुशांतच्या “काय पो छे’ या चित्रपटातील “मांजा’ या गाण्यावर पतंग उडविण्याचा आनंद घेताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
या गाण्याच्या निमित्ताने अंकिताच्या मनात सुशांतच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. “काय पो छे’ हा सुशांत सिंह राजपूतचा पहिला बॉलीवूड चित्रपट होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण करत एक उंच झेप घेतली. ज्याची भरारी “एम एस धोनी’सारख्या सुपरहिट चित्रपटापर्यंत जाऊन पोहोचली.