Ankita Lokhande Post | अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहचली. या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. याशिवाय तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. अंकिता सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक वैयक्तिक तसेच कामाबद्दलचे अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. अंकिता व विकीने 14 डिसेंबर 2021 रोजी मुंबई लग्न केले आहे. ‘बिग बॉस 17’ आणि ‘लाफ्टर शेफ्स 2’ च्या माध्यमातूनही या सेलिब्रेटी जोडप्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेत.
अंकिता लोखंडे प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची एकही संधी सोडत नाही. विकी जैनसोबत लग्न केल्यानंतरही अंकिता पडद्यावर काम करत आहे. अभिनेत्री दररोज नवनवीन पोस्ट शेअर करत असते. आता अंकिताने तिच्या नवीन डान्स व्हिडीओने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
तिच्या नवीन डान्स व्हिडिओमध्ये, अंकिता बॅकलेस ब्लाउजसह काळी साडी परिधान केलेल्या रेट्रो स्टाइलमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे सुपरस्टार शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘दिल तो पागल है’ या सुपरहिट चित्रपटातील ‘हे रे हे ये क्या हुआ…’ या रोमँटिक गाण्यावर डान्स करत आहे.
या व्हिडिओमध्ये ती एका शोच्या सेटच्या मागे दिसत आहे. अंकिताच्या चाहत्यांना तिची स्टाईल खूप आवडली आहे. अंकिताच्या या डान्स व्हिडिओला 1 लाख 11 हजार 029 चाहत्यांनी लाइक केले आहे. त्याच वेळी, अनेक चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये रेड हार्ट इमोजी देखील शेअर केले आहेत. अंकिता लोखंडेच्या डान्स व्हिडिओवर तिचे चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
अंकिताच्या या सुंदर रोमँटिक डान्सवर एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘तू नेहमीच साडीत खूप सुंदर दिसते’. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘तुझ्या डान्स मूव्ह्ज खूप सुंदर आहेत अंकु’. तिसऱ्या चाहत्याने लिहिले आहे की, ‘अंकितात खूप टॅलेंट आहे, तिला चित्रपटात काम द्या, मला आशा आहे की ती चित्रपटाची लीड अभिनेत्री बनेल’. अंकिताचे चाहते तिच्यावर आणि तिच्या डान्सवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी घेतले सात फेरे :
मुंबईतील पंचतारांकित ग्रॅंड हयातमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे ही तिचा बॉयफ्रेंड विकी जैन याच्याशी १४ डिसेंबर रोजी विवाहबद्ध झाली आहे. कुटुंबिय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत दोघांनी सात फेरे घेतले. मराठमोळ्या पद्धतीनं या विधी पार पडल्या होत्या. अंकिताने गुलाबी रंगाची पैठणी नेसली होती. तर मराठी परंपरेनुसार अंकिता आणि विकीनं कपाळावर मुंडावळ्या बांधलेल्या होत्या.