“बिग बॉस 14’मध्ये झळकणार अंकिता?

सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसच्या 14व्या सीजनचे लवकरच आगमन होणार असून नुकताच टीजर रिलीज करण्यात आला आहे. त्यातच या शोचे नाव बदलून बिग बॉस 2020 असे करण्यात आले आहे. दरम्यान, या शोमध्ये कोणकोणते कंटेस्टेंट असणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

View this post on Instagram

 

I’m waiting to meet my ganpatibappa this year ❤️ganpati Bappa laukar ya 😍 #throwback 2019 ganpatibappa

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची एक्‍स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे या शोमध्ये सहभागी होण्याची चर्चा आहे. त्यातच बिग बॉसचे मेकर्स लवकरच अंकिता लोखंडेला अप्रोच करण्यासाठी प्लॅनिंग करत आहेत.

 

View this post on Instagram

 

#justiceforsushantsinghrajput. #CBIforSSR

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

अंकिता लोखंडेची खास मैत्रिण रश्‍मी देसाई ही मागील शोमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी अंकिताने रश्‍मीला सपोर्ट करण्यासाठी पुढाकार घेतला होता. यामुळे आता अंकिता लोखंडे या शोची ऑफर स्वीकारणार की नाकारणार हे लवकरच समजेल.

 

View this post on Instagram

 

Hello my dear red you look gorgeous ❤️ #zeecineawards2020

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

दरम्यान, अंकिता लोखंडे ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. झी टीव्हीच्या टॅलेंट हंट शो झी सिने स्टार की खोजमध्ये सहभागी झाल्यानंतर अंकिता पवित्र रिश्‍तामध्ये मुख्य भूमिकेत झळकली होती. या मालिकेदरम्यानच अंकिता आणि सुशांतची ओळख झाली होती.

 

View this post on Instagram

 

🤍🤍🤍

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.