बारामती : निरावागजच्या सरपंचपदी अनिता देवकाते

बारामती (प्रतिनिधी) : महिलाराज असलेल्या तालुक्यातील निरावागज ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अनिता गणपत देवकाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सरपंच नंदा यशवंत देवकाते यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला. रिक्त पदावर निवडणूक घेण्यात आली. गावचे समाजसेवक गणपतराव देवकाते यांच्या पत्नी अनिता देवकाते यांचा एकमेव अर्ज सरपंच पदासाठी दाखल झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गायकवाड काम पाहिले.

यावेळी तलाठी संजय खाडे ,ग्राम विकास अधिकारी कैलास कारंडे , गावचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते , संपत देवकाते, माळेगावचे संचालक मदनराव देवकाते, दत्तात्रय भोसले माजी संचालक राजाभाऊ देवकाते ,सुरेश देवकाते, गुलाबराव देवकाते ,सोमनाथ भोसले, रमेशराव देवकाते, भगवानराव देवकाते , नामदेवराव मदने , सुनील देवकाते, ॲड हेमंत देवकाते ,सागर देवकाते, बाळासाहेब देवकाते, चंदरअण्णा देवकाते, तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच सर्व उपस्थित होते.

सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन गावचा कारभार पारदर्शकपणे केला जाईल. रस्ते पाणी वीज तसेच गावातील नागरिकांच्या विविध मूलभूत गरजा लक्षात घेऊन विकास कामाच्या माध्यमातून विविध समस्या सोडविल्या जातील. गावातील नागरिकांचा यामध्ये सहभाग महत्त्वाचा आहे.असे मत नवनिर्वाचित सरपंच अनिता देवकाते यांनी व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.