नवी दिल्ली – भारताच्या अनिष भानवाला याने जर्मनीत सुरू असलेल्या कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेतील 25 मीटर्स रॅपीड फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
अनिषने या स्पर्धेतील पात्रता फेरीत 584 गुण नोंदवित अव्वल स्थान घेत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत त्याने 29 गुण नोंदविले. भारताच्या आदर्शसिंग याचे ब्रॉंझपदक थोडक्यात हुकले. त्याने 17 गुणांसह चौथे स्थान घेतले.